
कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने रविवारी (ता. २०) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासह ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३११ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९१ झाली आहे.
अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने रविवारी (ता. २०) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासह ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३११ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९१ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारी (ता. १९) कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असतानाच रविवारी (ता. २०) आणखी एका रुग्णाचा बळी गेला. संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सदर रुग्ण दहिगाव ता. तेल्हारा येथील ६७ वर्षीय पुरूष होता. त्याला १८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान रविवारी (ता. २०) कोरोना संसर्ग तपासणीचे ४९६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४७ अहवाल पॉझिटिव्ह तर ४४९ अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व ३१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील पाच, राम नगर येथील चार, रणपिसे नगर, कौलखेड, गौरक्षण रोड व खेतान नगर येथील प्रत्येकी तीन जण, सिध्दी कॅम्प व बिर्ला रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मूर्तिजापूर, आरोग्य नगर, जीएमसी हॉस्टेल, मोठी उमरी, उरळ ता. बाळापूर, कृषी नगर, पत्रकार कॉलनी, आळशी प्लॉट, तोष्णीवाल ले०-आऊट, तापडीया नगर, तेल्हारा, हरिश कॉलनी, छोटी उमरी, डोंगरगाव, आदर्श कॉलनी, पारस, अकोट, सिंधी कॅम्प व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून दोन गोरक्षण रोड येथील तर मोठी उमरी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.
१७ जणांना डिस्चार्ज कोरोनाची सद्यस्थिती (संपादन - विवेक मेतकर) |
|||