esakal | पुन्हा एकाचा बळी; १७ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Another victim; 17 new positives

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १९) ७४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह तर ५७ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त उपचार घेताना एकाचा बळी सुद्धा गेला. संबंधित व्यक्ती गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ७२ वर्षीय महिला होती. तिला १७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.

पुन्हा एकाचा बळी; १७ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

 
अकोला :  कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १९) ७४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह तर ५७ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त उपचार घेताना एकाचा बळी सुद्धा गेला. संबंधित व्यक्ती गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ७२ वर्षीय महिला होती. तिला १७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यूचे सत्र कायम आहे.

सोमवारी (ता. १९) कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळले. संबंधित रुग्ण रणपिसे नगर येथील सहा, तर उर्वरीत सिंधी कॅम्प, एसपी ऑफिस जवळ, गोकुळ कॉलनी व मोठी उमरी, सिव्हील लाईन, कौलखेड, घुसर, शास्त्री नगर, अकोट, डाबकी रोड व जीएमसी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.

याव्यतिरीक्त कोरोनावर मात करणाऱ्या १७ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जणांना, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्काय लार्क येथील तीन, सूर्याचंद्रा हॉस्पिटल येथून एक, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर अवघते हॉस्पीटल येथून दोन जणांना अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८०७५
- मृत - २६६
- डिस्चार्ज - ७३५४
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ४५५

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top