कोरोनाचा आणखी एक बळी; तीन नवे पॉझिटिव्ह, ७२० ॲक्टिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 14 December 2020

कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता. १३) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासह तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२० झाली असून मृतकांची एकूण संख्या ३०३ झाली आहे.

अकोला  : कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता. १३) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासह तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२० झाली असून मृतकांची एकूण संख्या ३०३ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. १३) १ हजार १४७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार १४४ अहवाल निगेटिव्ह तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आले.

हे ही वाचा : शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणं अपात्र तर १३ पात्र ; ६ फेरचौकशीसाठी प्रलंबित

याव्यतिरीक्त खाजगी हॉस्पिटल येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण गड्डम प्लॉट, अकोला येथील ९२ वर्षीय महिला होती. तिला ३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

त्यातील चिखलगाव, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १७, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे ही वाचा : अकोल्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ९८६४
- मृत - ३०३
- डिस्चार्ज - ८८४१
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ७२०

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Another victim of Corona; Three new positive, 720 active patients