
येथून जवळच असलेल्या ग्राम नवथळ गटग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षा पूर्वी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावात गेल्या अनेक वर्षापासून गृहविभागाचे महत्त्वाचे असलेले पोलिस पाटील पद रिक्त आहे.
आगर (जि.अकोला) ः येथून जवळच असलेल्या ग्राम नवथळ गटग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षा पूर्वी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावात गेल्या अनेक वर्षापासून गृहविभागाचे महत्त्वाचे असलेले पोलिस पाटील पद रिक्त आहे. सदर पदभरती करावी यासंदर्भात गावातील समाजसेवा राजेंद्र तेलगोटे यांनी अनेक वेळा महसूल विभागाकडे अर्ज सादर केला आहे; परंतु अद्यापही गृह विभाग पद भरती करण्यास तयार नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे. यासंदर्भात तेलगोटे यांनी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे या गावातील रिक्त असलेले एसटी महिला गटातील पद भरावे याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे. या अर्जाबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन पोलिस पाटील पद का रिक्त आहे, यासंदर्भात लेखी अहवाल मागितला आहे. अहवाल शासनाकडे सादर करणार परंतु एसटी गटातील महिला यांच्याकडे उपविभागीय अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे सदर पद २०१५ पासून रिक्त आहे. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सदर पद एसी महिला गटासाठी आरक्षित करण्यात आले. परंतु शासनाच्या आदेशामुळेसदर पद रिक्त ठेवण्यात आले. यासंदर्भात आपणाकडे अनेक वेळा तक्रारीप्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार आपण या संदर्भात सखोल चौकशी करून गृह विभागाकडे तसेच विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे यासंदर्भात सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय खडसे यांनी दिली. (संपादन - विवेक मेतकर) |
|||