esakal | घरगुती सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर, जप्त केले १७ सिलिंडर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Domestic cylinders are being used commercially

 घरकुडी वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात असल्याचा प्रकार जठारपेठ येथील श्री गणेश स्वीट मार्टमध्ये सुरू होता. येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून १७ सिलिंडर जप्त केले.

घरगुती सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर, जप्त केले १७ सिलिंडर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा


अकोला : घरकुडी वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात असल्याचा प्रकार जठारपेठ येथील श्री गणेश स्वीट मार्टमध्ये सुरू होता. येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून १७ सिलिंडर जप्त केले.


रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या जठारपेठ चौकातील श्री गणेश स्विट मार्ट येथे हॉटेलच्या व्यवसायासाठी घरगुती सिलिंडरचा वापर केला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाला मिळाली.

त्याआधारे कारवाई करीत हॉटेलमधील खाद्य पदार्थ तयार करताना सिलिंडर व साठवणुकीतील १७ सिलिंडर जप्त करण्यात आले.

जीवन आवश्यक वस्तू कायदा कलम ३,७ प्रमाणे ही काराई करीत करण्यात आली. आरोपी गजानन चांडक (रा. राऊत वाडी) यांचे मालकी ताब्यातून सिलिंडर जप्त करून रामदास पेठ पोलिस स्टेशनला जीवन आवश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image