शुल्लक कारणावरून केला साथीदारांचा चाकू भोसकून खून

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर शुल्लक कारणावरून एका इसमाचा त्याच्याच साथीदारांना चाकू भोसकून खून केला.

अकोला  ः खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर शुल्लक कारणावरून एका इसमाचा त्याच्याच साथीदारांना चाकू भोसकून खून केला.

या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला गायगाव येथून अटक केली असून, गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयत हजर केले असता ता. २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

खदान परिसरातील मुख्य मार्गावर शेख हसन शेख बशीर यांच्यावर दारुच्या नशेत चाकू हल्ला करण्यात आला. त्याला जखमी अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी इरशाद खान अफरोज खान यास गायगाव येथून अटक केली. पुढील तपास खादन पोलिस करीत आहेत.

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Attack on a partner for a fee