बंजारा काशी झाली पोरकी, संत रामराव महाराज यांचे देहावसान 

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 31 October 2020

संपूर्ण जगातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख असलेली पोहरादेवी आज पोरकी झाली आहे. येथील धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान देहावसान झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बंजारा समाजात शोक व्यक्त केला जात आहे. 

वाशीम. : संपूर्ण जगातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख असलेली पोहरादेवी आज पोरकी झाली आहे. येथील धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान देहावसान झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बंजारा समाजात शोक व्यक्त केला जात आहे. 

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी संपूर्ण जगातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख आहे. जगातील संपूर्ण बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांची समाधी व माता जगदंबा शक्तीपीठ येथे आहे.

या समाजाची गुरूगादी येथे असून या गादीवर 1948 पासून संत रामराव महाराज आसीन होते. ते संपूर्ण बंजारा समाजात गुरू म्हणून पुज्यनिय होते. रामनवमी व गुरूपोर्णिमेला येथे मोठी गर्दी होतेआहे संपूर्ण भारतातील बंजारा समाज सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी रिघ लावतो.

महान तपस्वी असलेले रामराव महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून बरी नव्हती. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान देहावसान झाले आहे.

संत रामराव महाराज यांच्या देहावसानाचे वृत समजताच संपूर्ण बंजारा समाजात शोक व्यक्त केला जात आहे. संत रामराव महाराज महाराज यांच्यावर पोहरादेवी येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Banjara Kashi became an orphan, Saint Ramrao Maharaj passed away