
केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यासह बँकांबाबतच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप केला. या संपात सर्वच बँकांचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने बँकांचे काम दिवसभर बंद होते. कर्मचाऱ्यांनी जठारपेठ स्थित बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंचल शाखेपुढे निदर्शने केली.
अकोला : केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यासह बँकांबाबतच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप केला. या संपात सर्वच बँकांचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने बँकांचे काम दिवसभर बंद होते. कर्मचाऱ्यांनी जठारपेठ स्थित बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंचल शाखेपुढे निदर्शने केली.
देशातील सर्व कर्मचारी संघटनांनी (भारतीय मजदूर संघ सोडता) दहा मध्यवर्ती कामगार संघटनानी प्रामुख्याने कामगार कायद्यात बदल, जनहित विरोधी आर्थिक धोरण , शेतकरी विरोधी धोरनांच्या विरोधात संप पुकारला. केंद्रीय कामगार संघटनांच्या सात समान मागण्यासोबत सर्व बँकातील एआईबीईए व एआईबीओए या संघटना संपात सहभागी होवून खालील मागण्या केल्या आहेत.
हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली त्वरित थांबवा, सार्वजनिक बँकांना सशक्त बनवा, हेतूतः कर्ज थकवीनाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, अवाढव्य कार्पोरेट एन.पी.ए. वसूल करा, बँकातील ठेवींवरील व्याजदरात वाढ करा, बँकिंग नियमित कामांची आऊट सोर्सिंग त्वरित बंद करा, बँकांमधून पुरेशा प्रमाणात नोकर भरती करा, बँक कर्मचाऱ्यांना लागू असलेली नवी पेंशन योजना त्वरीत मोडीत काढा व जुनी पेंशन योजना लागू करा.
हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !
सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका सशक्त करा. या सर्व मागण्यांसाठी अकोला स्थित ऑल बँक्स को-ओर्डिनेशन कमिटी अकोलातर्फे स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्र , अंचल कार्यालय , जठारपेठ अकोला समोर सकाळी ११ वा. सर्व बँकातील कर्मचारी सुद्धा सहभागी झालेत व निदर्शने व घोषणाबाजी केली.
हेही वाचा - सराफा दुकानातील नोकराने दुकानासमोरच घेतला गळफास!
या कार्यक्रमात विविध बँकांचे ६० सदस्य मास्क घालून उपस्थित होते. या कार्यक्रमात श्याम माईणकर, दिलीप पिटके यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे अन्य पदाधिकारी प्रवीण महाजन, प्रकाश देशपांडे, मंगेश डामरे, प्रजय बनसोड, माधव मोतलग, राजू कुलकर्णी, उमेश शेळके, अनिल मावले, आशीष मावंदे, सचिन पाटिल, कुलदीप महल्ले, प्रशांत अग्निहोत्री, शैलेंद्र कुलकर्णी, प्राची वखरे, श्रीमती सुजाता शेळके, राधा हरकल आदींस सह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सेवानिवृत्त संघटनेचे सुदर्शन सोनोने, राजेश गणकर उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)