
बँकेच्या व्यवहाराशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असली तरी काल गुरुवार 26 नोव्हेंबर देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाली. त्यामुळे बँकेच्या कामकाजावरही मोठा परिणाम दिसून आला. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना तशा सूचनाही दिल्या.
अकोला: बँकेच्या व्यवहाराशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असली तरी काल गुरुवार 26 नोव्हेंबर देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाली. त्यामुळे बँकेच्या कामकाजावरही मोठा परिणाम दिसून आला. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना तशा सूचनाही दिल्या.
राष्ट्रीय व्यापार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने देखील या संपात सहभाग घेतला.
हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
75 टक्के कामगारांना वगळले कामगार काद्यातून
नुकतेच लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान 27 कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नवीन कायदे या कामगारांना कोणतेही संरक्षण देणार नाहीत, असं ‘एआयबीईए’चं म्हणणं आहे.
हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !
शनिवार-रविवारीही सुट्टी
26 नोव्हेंबरच्या संपाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बँकांचे कामकाज सुरळीत होईल. यानंतर पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 नोव्हेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील.
सोमवारीही सुटी
संप आणि वीकेंड सुट्यांनंतर सलग लागून आलेली गुरु नानक जयंतीच्या सुटीमुळे सलग सुट्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.