esakal | लाभार्थ्यांना मिळणार १.२० लाखांच्या जनावरांचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Beneficiaries will get 1.20 lakh animals

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांसाठी आता दोन लाभाची रक्कम १ लाख २० हजार रुपये आणि विम्या निश्चित करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना मिळणार १.२० लाखांच्या जनावरांचा लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांसाठी आता दोन लाभाची रक्कम १ लाख २० हजार रुपये आणि विम्या निश्चित करण्यात आली आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली असल्याने लाभार्थ्यांच्या हिताचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतल्याचे बोलल्या जात आहे.


ग्रामीण भागातील लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत व त्यांना स्वयंराेजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत गत आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये दुधपूर्णा याेजना राबविण्यात आली. त्यानंतर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात दुधाळ जनावरे वाटप ही याेजना राबविण्याची तयारी करण्यात आली. ही याेजना १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे. परिणामी आता लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


जनावरांना विमा कवच
दुधाळ जनावरे वाटप याेजनेसाठी १ काेटी २० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एका लाभार्थ्यांला म्हैसवर्गीय दाेन दुधाळ जनावरे वाटप करण्यात येणार आहेत. यापूर्वी प्रती जनावर ४० हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद हाेती. मात्र आता हे अनुदान ६० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच विम्याचेही कवच मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image