esakal | बिबट्यांच्या झुंडीला वाहनाने दिली जोरदार धडक
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Bibat killed in vehicle collision

: वाडेगाव - बाळापूर महामार्ग ओलांडताना बिबट्यांच्या झुंडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बाळापूर जवळील मांडवा शेतशिवारात घडली.

बिबट्यांच्या झुंडीला वाहनाने दिली जोरदार धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला)  : वाडेगाव - बाळापूर महामार्ग ओलांडताना बिबट्यांच्या झुंडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बाळापूर जवळील मांडवा शेतशिवारात घडली.


या नर बिबटचे वय सव्वा दोन वर्षे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यातील बटवाडी शेतशिवारात बिबट्यांचा वावर आहे. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले आहे,

तर बटवाडी येथील गायीचा बिबट्याने फडशा देखील पाडल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चार ते पाच बिबट रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यापैकी एका नर बिबटला गंभीर दुखापत झाली.

बराच वेळ उपचाराविनापडून राहिल्याने तिथेच त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी पोहोचले. आरएफओ आर. एन. ओवे व वनविभागाचे कर्मचारी, बाळापूर ठाणेदार नितीन शिंदे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. वनविभागाने बिबट ताब्यात घेतले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image