esakal | वाजवा रेऽऽऽ बॅंड बाजासह संगीत कार्यक्रमांना परवानगी, नियम व अटी लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Permits, rules and conditions apply to concerts with band instruments

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार (ता. १२) पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्न समारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरू करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली आहे

वाजवा रेऽऽऽ बॅंड बाजासह संगीत कार्यक्रमांना परवानगी, नियम व अटी लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार (ता. १२) पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्न समारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरू करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली आहे. प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तींच्‍या अधीन राहून सदर मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांसह उपक्रमांवर बंदी लावण्यात आली होती. दरम्यान आता शासनाने मिशन बिगिन अगेन सुरू केले असून टाळेबंदीचे टप्प्या-टप्प्याने शिथिलीकरण सुरू केले आहे. त्याअंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांवरील बंदी शिथिल करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाचा धोका कमी होत असल्याने गुरुवार (ता. १२) नोव्‍हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. त्यानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्‍यक उपाययोजनेचा अवलंब करुन पुढील नमूद केलेल्‍या अटी व शर्तींनुसार पुढील आदेशापर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदरचे आदेश १० नोव्हेंबरपासून संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.


या आहेत अटी व शर्ती
- ३० सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार लग्न समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश असेल. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) राखून बँड बाजविणे, संगीत कार्यक्रम घेणे बंधनकारक राहिल.
- बैंड पथक व संगीत कार्यक्रम पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनिंग करून त्यांची नॉंद करुन घेणे बंधनकारक राहिल.
- बँड पथकाकरिता व संगीत कार्यक्रमाकरिता आवश्यक असणारे साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करुन वापरणे बंधनकारक राहिल.
- कोविड-१९च्या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image