esakal | एटीएममधून पैसै काढताना पासर्वड बघून खात्यातून काढले पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Withdrawing money from an account by looking at the password while withdrawing money from the ATM

एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली.

एटीएममधून पैसै काढताना पासर्वड बघून खात्यातून काढले पैसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली.


लहान उमरी येथील शरद श्यामराव कलोरे (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ फेब्रुवारी २०२० रोजी जठारपेठ परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून दुपारच्या वेळी ते पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने एटीएमचा पासवर्ड दाबण्यास सांगितले.

त्यावेळी चोरट्याने तो पासवर्ड बघून घेतला. त्यानंतर पैसे निघत नसल्याचे सांगितले. त्यामुळे कलोरे तेथून निघून गेले. त्यानंतर कलोरे यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढण्यात आल्याची तक्रार कलोरे यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात दिली होती.

अशाच प्रकारे एटीएम कार्ड बदलून फसवणूक झाल्याच्या तक्रारी सिव्हिल लाईन्स व पातूर पोलिस स्टेशनसह जिल्ह्यात नोंदविण्यात आल्याने पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.

त्यानुसार पातूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बायस ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, रफिक शेख, माजिद शेख, एजाज अहेमद, रवी इरचे, सायबर सेलचे गणेश सोनोने, ओम देशमुख, पातूरचे सोहिले खान यांनी तपास सुरू केला.

गोपनिय माहितीच्या आधारावर बदलापूर (ठाणे) येथील २५ वर्षीय युवक सागर बबन थोरात याला पातूर येथे शिताफीने अटक केली. त्यानंतर पोलिस तपासात त्याने अकोला व पातूर येथे केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील ३१ हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.