esakal | नफा हातात सापडत नसल्याने उभ्या कपाशीत सोडली जनावरे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bondali strikes cotton in Nandura taluka

कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या नांदुरा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सद्या अतिशय दैना सुरू असून, कापसावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले असल्याने कापसाला कीड लागली असून, वेचायलाही त्रास देत आहे

नफा हातात सापडत नसल्याने उभ्या कपाशीत सोडली जनावरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

नांदुरा (जि.बुलडाणा):  कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या नांदुरा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सद्या अतिशय दैना सुरू असून, कापसावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले असल्याने कापसाला कीड लागली असून, वेचायलाही त्रास देत आहे

.२० रुपये किलो वेचाई व विक्री मात्र, ३५ ते ४० रुपये प्रति किलोने पडत असल्याने हा कापूस न वेचलेला बरा म्हणून अनेक शेतकरी कापूस फूटलेक्या उभ्या कपाशीत जनावरे व ट्रॅक्टर टाकत आहेत.


वऱ्हाड ही पांढऱ्या सोन्याची कऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भातील खास करून बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, मलकापूर व खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे कपाशी आहे. लांब धाग्याचा कापूस येथे उत्पादीत होत असल्याने मलकापूर व खामगाव येथील जिनिंगचे महत्त्वही संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीकास पात्र ठरले आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून याच लांब धाग्याच्या कापसाला शेवटच्या स्ट्रोकमध्ये बोंडअळीचे ग्रहण लागत चालल्याने येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

यावर्षी तर बोंडअळीने कमी कालावधीतच आक्रमण केल्याने वरचा अर्धा अधिक माल हा कीड लागून खराब झाल्याने नगण्य उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती सापडत आहे. खर्च जास्त व त्यातून काहीच शिल्लक राहत नसल्यामुळे आजरोजी तर शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत जनावरे व ट्रॅक्टर फिरवून कपाशी पीकच नेस्तनाबूत करण्याचा सपाटा सुरू केला आहे.


वेचाई खर्चही निघेना..!
सद्या चांगल्यापैकी फूटलेला शेतातील कापूस वेचायचा म्हटला तर मजुरांच्या वेळेपर्यंत एक मजूर ८ ते ९ व जास्तीत जास्त १० किलो कापूस असा २०० रुपये रोजातून वेचत असून, त्यांचे ऑटो भाडे व मुकादम खर्च असा एका मजुरामागे वेगळा ४० रुपये प्रति दिवस खर्च येत आहे. तर, दुसरीकडे हाच क्वालिटी नसलेला कापूस खासगी व्यापारी ३५ ते ४० रुपये प्रति किलोप्रमाणे खरेदी करीत असल्याने शेतकऱ्याच्या खिश्यातून उत्पन्नापेक्षाही जास्तीचे पैसे जात आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)