व्यवसाय अभ्यासक्रमाची रूपांतर प्रक्रिया रद्द करा

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 9 October 2020

विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार तथा नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यवसाय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण २८ ऑक्टोबर १९८८ च्या शासन आदेशाने राज्यात राबवण्यात आले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय वा नोकरीपेशात कार्यरत झालेले आहेत.

अकोला  ः विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार तथा नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यवसाय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण २८ ऑक्टोबर १९८८ च्या शासन आदेशाने राज्यात राबवण्यात आले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय वा नोकरीपेशात कार्यरत झालेले आहेत.

केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा कौशल्य विकासाचा आग्रह धरला असून नवीन अभ्यासक्रम हा कौशल्याधिष्ठित असावा असे म्हटले आहे. भविष्यात अशा अभ्यासक्रमाला प्रोहत्सान देणे गरजेचे आहे.

त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकाकडून एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे रूपांतर न करता या अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण करण्याची मागणी विज्युक्टाने केली आहे.

राज्यांमध्ये एक हजारापेक्षा अधिक संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी कौशल्य विकासाचे शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातसुध्दा अनेक ठिकाणी हा अभ्यासक्रम चालवला जात आहे. या अभ्यासक्रमाचे रूपांतर करण्याचा घाट घातला जात आहे.

त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून यामुळे हजारो विद्यार्थी कौशल्या शिक्षणापासुन वंचित होतील व शिक्षकसुध्दा अतिरिक्त होतील.

त्यामुळे व्यवसाय अभ्यासक्रमाची रूपांतर प्रक्रिया रद्द करून त्याचे सक्षमीकरण करण्यात यावे, अशी मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ.अविनाश बोर्डे यांनी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नबाब मलिक यांच्याकडे केली आहे.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Cancel the business course conversion process