तेल्हारा व बाळापूर संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 15 December 2020

 जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू नाही, परंतू जिल्ह्यातील तेल्हारा वा बाळापूर या दोन तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल.

अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू नाही, परंतू जिल्ह्यातील तेल्हारा वा बाळापूर या दोन तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल.

अन्य तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत, त्या क्षेत्रात व सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या १४ ऑक्टोबर २०१६, ६ सप्टेंबर २०१७ व ३१ जुलै २०१८ च्या आदेशान्वये ज्या जिल्ह्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहिल. ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल. तसेच निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल.

ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातच आचारसंहिता
अकोला जिल्ह्यात ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू नाही. परंतू जिल्ह्यातील तेल्हारा व बाळापूर या दोन तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहिल. अन्य तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत, त्या क्षेत्रात व सिमेलगतच्या गावांमध्येही आचारसंहिता लागू राहिल.

निवडणुका नसतील तेथे विकास कामे सुरूच राहणार
त्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात निवडणुका नसतील तेथील विकास कामांवर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही ज्यामुळे निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मतदारांवर विपरित प्रभाव पडेल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. तथापि सर्व यंत्रणांनी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे आचारसंहितेचे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Code of conduct enforced in Telhara and Balapur talukas