
दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी पिकाच्या हंगामावर ढगाळ वातावरणामुळे मोठा परिणाम दिसून येत असून तूर,हरभरा,मका व इतर रब्बी पिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे ही पिके वाचविण्यासाठी विविध प्रकारची महागडी कीटकनाशकांची फवारणी करून अतिरिक्त खर्च सोसावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
नांदुरा (जि.बुलडाणा) : दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी पिकाच्या हंगामावर ढगाळ वातावरणामुळे मोठा परिणाम दिसून येत असून तूर,हरभरा,मका व इतर रब्बी पिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे ही पिके वाचविण्यासाठी विविध प्रकारची महागडी कीटकनाशकांची फवारणी करून अतिरिक्त खर्च सोसावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. नांदुरा तालुक्यात यावर्षीच्या परतीच्या पावसाने खरिपाची नासाडी केली असल्याने पहिलेच शेतकरी हा चिंतेत आहे. असे असतांनाही खरिपाची भरपाई रब्बीतून व्हावी यासाठी पूर्ण ताकदीनिशी त्याने रब्बीची तयारी करून गहू, हरभरा, मका या पिकाची पेरणी केली असता नुकत्याच दोन तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने महागडी कीटकनाशके फवारणी करून ही पिके जगविण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत आहे. सद्या तूर पीक कुठे फुलात तर कुठे शेंगा भरणीच्या अवस्थेत असून त्यावर अळीचे आक्रमण झाले आहे.तर मका,हरभरा व गहू पिकाच्या लहान अवस्थेतच त्यावरही वेगवेगळ्या प्रकारच्या अळीने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे .या पिकावर कमीत कमी आठ दिवसातून कोणतीही एक महागडी फवारणी करावी लागत असल्याने खर्च हा वाढत चालला आहे.या सततच्या येणाऱ्या ढगाळ काळ्याभोर आकाशाकडे सद्या शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असून गारपीट झाली तर काही हाती लागेल की नाही.या चिंतेने ग्रासले असून पीक घरात येईल तेव्हाच खरे अशी म्हणण्याची पाळी बळीराजावर सध्या आली आहे.
पीक हाती येण्याची शक्यता नसतानाही रब्बीवर जोर (संपादन - विवेक मेतकर) |
|||