आज कोरोनाचे नवे २५ पॉझिटिव्ह; ११ जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. १३) १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०७ अहवाल निगेटिव्ह तर २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२३ झाली आहे.
 

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. १३) १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०७ अहवाल निगेटिव्ह तर २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२३ झाली आहे.

कोरोना विषाणूने जिल्ह्यात गत ९ महिन्यांपासून थैमान घातलं आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार ६१७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.

त्यात प्राथमिक तपासणीचे ४३ हजार ३४४, फेरतपासणीचे २३८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे एक हजार ३५ नमुने होते. त्यापैकी आजपर्यंत एकूण ४४ हजार ५३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 37583 तर पॉझिटीव्ह अहवाल ८ हजार ६५३ झाली आहे.

या भागात आढळले नवे पॉझिटिव्ह
दरम्यान शुक्रवारी (ता. १३) दिवसभरात २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आदर्श कॉलनी येथून तीन जण, जठारपेठ, शंकर नगर जठारपेठ व शिवकृपा क्लिनिक येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत ज्ञानेश्वर नगर डाबकी रोड, देशमुख फैल, कान्हेरी सरप, गोरक्षण रोड, अंबिका रेसिडेन्सी, अंजनगाव सुर्जी, बार्शीटाकळी, केशव नगर, धारेल, सुकोडा, तेल्हारा, टाकळी, आलेगाव ता. पातूर, नित्यानंद नगर, मूर्तिजापूर व दत्ता कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

११ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून शुक्रवारी (ता. १३) दोन जणांना, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, युनिक हॉस्पीटल येथून एक जण तर हॉटेल स्कायलार्क येथून एक जण, अशा एकूण ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८६५३
- मृत - २८३
- डिस्चार्ज ८१२५
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - २४५

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona 25 new positives today; Discharge of 11 persons