esakal | कोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona 30 new positives; Another victim!

कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ३०) जिल्ह्यात १६५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३५ अहवाल निगेटिव्ह तर ३० अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे.

कोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना विषाणूग्रस्तांचा आलेख जिल्ह्यात घसरत असल्याचे गत काही दिवसांपासून दिसून येत आहे.

कोरोनाचे शुक्रवारी (ता. ३०) ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. याव्यतिरीक्त एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित रुग्ण माधव नगर, ता. तेल्हारा येथील ७८ वर्षीय पुरुष असून त्याला २५ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर मृत्यूनंतर जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या २७९ झाली आहे.


कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ३०) जिल्ह्यात १६५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३५ अहवाल निगेटिव्ह तर ३० अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे.

संबंधित रुग्ण सातव चौक येथील चार, मूर्तिजापूर, रजपुतपूरा व राजंदा येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, रामदास पेठ, रेणुका नगर व तोष्णीवाल ले-आऊट येथील दोन तर उर्वरित तारफैल, जीएमसी, देवरावबाबा चाळ, जठारपेठ, महाजन प्लॉट, जवाहर नगर, भागवत वाडी जुने शहर, व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण महिला असून ती अकोट येथील रहिवासी आहे. कोरोनाग्रस्तांमध्ये सदर रुग्णांची भर पडली असली तरी सध्या जिल्ह्यात प्रत्यक्षात २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.

९३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शुक्रवारी (ता. ३०) सहा जणांना, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, अकोला ॲक्सीडेंड क्लिनिक येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, कोविड केअर सेंटर येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या ८० अशा एकूण ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८३८४
- मृत - २७९
- एकूण डिस्चार्ज - ७८६४
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - २४१

(संपादन - विवेक मेतकर)