esakal | कोरोना आणखी दोघांचा मृत्यू; २६ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona dies of two more; 26 new positives

 कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गाने होणारे मृत्यूसत्र जिल्ह्यात सुरूच आहे. बुधवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत २९५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी आणखी २६ नव्या रुग्णांची भर पडील आहे.

कोरोना आणखी दोघांचा मृत्यू; २६ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गाने होणारे मृत्यूसत्र जिल्ह्यात सुरूच आहे. बुधवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत २९५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी आणखी २६ नव्या रुग्णांची भर पडील आहे.


दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे २०१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७५ अहवाल निगेटीव्ह तर २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९४९१ एवढी झाली आहे.

बुधवारी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी प्राप्त १५ अहवालांचा समावेश आहे. आज सायंकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

हा रुग्ण तेल्हारा येथील पुरुष रुग्ण आहे. मंगळवारी (ता.१) रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन मृत्यूची नोंद झाली आहे. हे दोघे रुग्ण पुरुष असून, त्यातील एकाचा हॉटेल रेजेन्सी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हा ५६ वर्षीय रुग्ण जठारपेठ येथील असून, ता.१३ नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचारा दरम्यान ता.१ रोजी मृत्यू झाला. तर अन्य रुग्ण हा ४५ वर्षीय असून अकोलखेड ता. अकोट येथील रहिवासी आहे. हा रुग्ण ता.२८ नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.

१३ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन अशा १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


५८३ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९४९१आहे. त्यातील २९५ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८६१३ आहे. तर सद्यस्थितीत ५८३ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image