भय इथले संपत नाही!, कोरोनाची वर्षपूर्ती, कोट्यवधीचे नुकसान

akola news Corona first patient on April 7, 2020
akola news Corona first patient on April 7, 2020

अकोला  ः वैद्यकीय यंत्रणेसह समस्त नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कोरोनाला जिल्ह्यात ता. ७ एप्रिल २०२१ रोजी एक वर्ष होत आहे. गत वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील बैदपूरा भागातील रहिवाशी रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या एक वर्षात जिल्हाभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आतापर्यंत ४७६ रुग्णांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, लसीकरण सुरू होताच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने कोरोनाचे भय कायम आहे.

ता. १७ नोव्हेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या जन्माची जागतिक वर्षपूर्ती झाली. चीनच्या वुहान शहरात याच दिवशी कोरोनाचे लक्षणं असलेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा साथरोग वेगानं पसरत सर्व जगात पोहचला. भारतात देखील दाखल झाला. त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात कोरोनानं प्रत्येक गाव, बिल्डिंग, गल्ली गाठली. प्रशासनाच्या कडक उपाययोजना कोरोनाला पूर्णपणे प्रतिबंध करू शकल्या नाहीत हे गंभीर वास्तव समोर आले. कोरोनामुळे स्मशान भूमीत पार्थिवांची ‘वेटिंग’ पाहायला मिळाली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार न करताच दुरून अंतिम कर्तव्य बजावणारी मुलं सुद्धा कोरोनामुळे कशी परकी होतात, हे दिसून आलं. दरम्यान वर्षभरापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे आतापर्यंत जिल्ह्यात २९ हजार २६७ रुग्ण आढळळे असून त्यापैकी २४ हजार ६०३ रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात
---------------
आतापर्यंत वयानुसार आढळलेले रूग्ण
- ५ वर्षांपेक्षा कमी - २०८
- ५ ते १० वर्ष - ५२१
- ११ ते २० वर्ष - २ हजार ४२७
- २१ ते ३० वर्ष - ५ हजार ७३३
- ३१ ते ४० वर्ष - ६ हजार १३३
- ४१ ते ५० वर्ष - ५ हजार ७३२
- ५१ ते ६० वर्ष - ४ हजार ९४७
- ६० वर्षावरील - ४ हजार ९५२
---------------
कोट्यवधीचे नुकसान
देशात कोरोना आल्याने मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अडीच ते तीन महिने कडक लॉकडाउन करण्यात आले होते. या लॉकडाऊन मध्ये सगळेच आप-आपल्या घरात होते. कोरोनामुळे लॉकडाउन लावल्यामुळे आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला शिवाय जिल्ह्यातील व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांना पोटाची भूक भागवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
-----------------
पहिले पॉझिटिव्ह रुग्ण सध्या ठणठणित
बैदपुरा परिसरात राहणारे जिल्ह्यातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या ठणठणित आहेत. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या तीन महिन्या आधी ते दिल्ली येथे गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. परत आल्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या घरातील नऊ सदस्यांना सर्वोपचारमध्ये क्वारंटाईन केल्यानंतर सात सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते; परंतु त्यांचा साडेतीन वर्षांचा नातू व सहा वर्षांची नात कोरोना बाधित आढळले होते. २२-२४ दिवस उपचार घेतल्यानंतर व कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. कोरोना मुक्तीनंतर जिल्ह्यातील पहिले रुग्ण सध्या ठणठणित आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com