कोरोनाचे अहवाल घटले; ९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, १८५ ॲक्टिव्ह रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Corona reports down; 9 new patients positive, 185 active patients

कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल घटल्यामुळे सोमवारी (ता. २) जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन १८५ झाली आहे. त्यासह एकूण रुग्णांची संख्या सुद्धा ८ हजार ४२८ झाली आहे.

कोरोनाचे अहवाल घटले; ९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, १८५ ॲक्टिव्ह रुग्ण

अकोला   ः कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल घटल्यामुळे सोमवारी (ता. २) जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन १८५ झाली आहे. त्यासह एकूण रुग्णांची संख्या सुद्धा ८ हजार ४२८ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. २) जिल्ह्यात ७४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६५ अहवाल निगेटिव्ह तर ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील छोटी उमरी येथील दोन, तर उर्वरित गांधीग्राम, शास्त्री नगर, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, अकोट फैल, जठार पेठ व तापडिया नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल सोमवारी (ता. २) घटल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा घटली. असे असले तरी आता जिल्ह्यात १८५ ॲक्टिव्ह रुग्णच असल्याचे दिसून येत आहे.


३६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सोमवारी (ता.२) सात, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा २० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८४२८
- मृत - २८१
- डिस्चार्ज - ७९६२
- ॲक्टिव्ह रुग्ण - १८५

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top