कोरोना चाचणी अहवालांची संख्या घटली, आणखी २४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 9 October 2020

दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे १६७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४३ अहवाल निगेटिव्ह तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले. आज एकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना चाचणी अहवालांची संख्या घटू लागली असून, त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही घटली आहे. रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अकोला  ः दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे १६७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४३ अहवाल निगेटिव्ह तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले. आज एकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना चाचणी अहवालांची संख्या घटू लागली असून, त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही घटली आहे. रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दिवसभरात २४ रुग्णांची भर
गुरुवारी दिवसभरात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात चार महिला व १६ पुरुषांचा समावेश होता. त्यातील बार्शीटाकळी येथील तीन जण, गीता नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन उर्वरित राजपूतपुरा जवळ, जवळका ता. अकोट, अजनी ता. बार्शीटाकळी, कृषी नगर, आदर्श कॉलनी, मोहम्मद अली रोड, संतोषी माता मंदिरजवळ, खदान, शिवाजी चौक, शिवनी, अकोट, जीएमसी व निंभोरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट, फुले चौक, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

४२ रुग्णांना सुटी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून चार जण, अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक जण, अकोला अक्सीडेंट क्लिनीक येथून पाच जण व सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जणांना, अशा एकूण ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू
गुरुवारी दुपारी एकाचा मृत्यू झाला. संतोषी माता मंदिरजवळ, रामदासपेठ येथील ६५ वर्षीय पुरुष असून, ते ६ ऑक्टोबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

७९७ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ७७४१ आहे. त्यातील २४९ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ६६९५ संख्या आहे. सद्यस्थितीत ७९७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७७४१
- मृत - २४९
- डिस्चार्ज - ७७४१
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७९७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona test reports drop, 24 more positive, one dies