कोरोना अपडेट; आणखी एक बळी; २० नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात वेग कमी झाला असला तरी कोरोनामुळे आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला व २० नवे रुग्णा पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या ३२३ झाली असून मृतकांची संख्या २८५ झाली आहे.

अकोला  ः कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात वेग कमी झाला असला तरी कोरोनामुळे आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला व २० नवे रुग्णा पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या ३२३ झाली असून मृतकांची संख्या २८५ झाली आहे.

गत नऊ महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातलं आहे. कोरोनाचे जिल्ह्यात मंगळवारी (ता. १७) ११९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यापैकी ९९ अहवाल निगेटिव्ह तर २० अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त बाळापूर तालुक्यातील पारस येथील ६६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. त्याला ९ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या २० रुग्णांमध्ये १० महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यात केशवनगर येथील आठ, शिवचरण पेठ येथील तीन तर उर्वरीत सहकार नगर, कान्हेरी सरप, गजानन पेठ, शास्त्री नगर, खदान, सिंधी कॅम्प, उमरी, पातूर नंदापुर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून मंगळवारी (ता. १७) आठ, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेंसी येथून एक अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह ८७७७
- मृत - २८५
- डिस्चार्ज - ८१६९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ३२३

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona Update; Another victim; 20 new positives