
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शुक्रवारी (ता. ६) कोरोना संसर्ग तपासणीचे ११७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटिव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता कोरोनाचे १९४ रुग्ण उपचार घेत आहेत.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शुक्रवारी (ता. ६) कोरोना संसर्ग तपासणीचे ११७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटिव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता कोरोनाचे १९४ रुग्ण उपचार घेत आहेत.
गत सात महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या गत काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ६) १३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले.
त्यात तीन महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ व अकोट येथून प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवाजी पार्क, आलेगाव ता. पातूर, तापडिया नगर, दीपक चौक, बलोदे लेआऊट, मूर्तिजापूर, गोरक्षण रोड, माधव नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.
२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शुक्रवारी (ता. ६) तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून तीन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या १२ जणांना, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८५१४
- एकूण मृत - २८२
- डिस्चार्ज - ८०१५
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - १९४
(संपादन - विवेक मेतकर)