esakal | नऊ महिन्यानंतरही सभामंडपाचा पाळणा हलेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Work of Jangir Maharaj Sansthan auditorium stalled

जानगिर महाराज संस्थानच्या कमानीजवळील स्मशानभूमीसाठी विद्यमान आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून सभामंडपाच्या कामासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

नऊ महिन्यानंतरही सभामंडपाचा पाळणा हलेना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

शिरपूर (जि.वाशीम) ः  जानगिर महाराज संस्थानच्या कमानीजवळील स्मशानभूमीसाठी विद्यमान आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून सभामंडपाच्या कामासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

सुमारे नऊ महिण्यांपूर्वी सुरू केलेले हे सभामंडपाचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. ठरवून दिलेल्या वेळेत कंत्राटदाराने काम पूर्ण केलेले नसताना बांधकाम विभाग अद्यापही ॲक्टीवेट झालेला नसल्याने जनतेत रोष पसरला आहे.


आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत जानगिर महाराज संस्थानच्या कमानीजवळील स्मशानभूमीत पाच लाख रुपयांच्या सभामंडपाच्या बांधकामास मंजूरात मिळाली होती. मागील नऊ महिण्यापूर्वी सभामंडपाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी ठरवून दिलेला अवधी कधीचाच संपला आहे.

परंतु आज स्मशानभूमीत सहा खांब व त्यावरील छताशिवाय कामात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही. कामाची गती व कामाचा दर्जा इत्यादींची तपासणी करणारी यंत्रणा याबाबतीत अनभिज्ञ म्हणावी की, त्या यंत्रणेने सोयीस्कर डोळेझाक केली आहे, असा प्रश्न सदर सभा मंडपाकडे पाहिल्यावर पडल्यावाचून राहत नाही.


नागरिकांना पडले अनेक प्रश्‍न
सदर कामास नऊ महिन्याचा कालावधी होऊनही काम अद्याप पूर्णत्वास का गेले नाही? सभा मंडपाला भिंती, दरवाजे, खिडक्या व रंगरंगोटी केलेली नसते काय? कंत्राटदाराने काम अर्धवट का सोडून दिले?सदर कामाचे काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र संबंधित विभागाने दिले का? ठरवून दिलेल्या कालावधीत कंत्राटदाराने काम पूर्ण करणे बंधनकारक असताना कंत्राटदाराला संबंधित विभागाकडून सवलत का देण्यात येत आहे? संबंधित विभाग कंत्राटदाराच्या दिरंगाईकडे डोळेझाक का करीत आहे? इत्यादी प्रश्न जागरुक नागरिकांकडून विचारले जात आहेत असून, या सभामंडपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.


रखडलेल्या बांधकामाबाबत कंत्राटदारास काम पूर्ण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
- दयाराम खारोडे, अभियंता, बांधकाम विभाग वाशीम


संबंधित सभामंडपाचे काम हे मंजूर केलेल्या इस्टीमेटनुसार करण्यात यावे तसेच येत्या १ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्यावतीने बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल.
- किशोर प्रकाशराव देशमुख, मालेगाव तालुका उपाध्यक्ष, अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, नवी दिल्ली

(संपादन - विवेक मेतकर)