esakal | कोरोना योद्धा आंदोलनाच्या तयारीत!, नोकरीत पुन्हा समावून न घेतल्याने करणार आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona warriors are preparing for the agitation!

कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका, अधिकाचारिकी व वार्ड बॉय यांना पुन्हा सेवे समावून घेण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जीएमसीच्या अधिष्ठतांकडे केली आहे.

कोरोना योद्धा आंदोलनाच्या तयारीत!, नोकरीत पुन्हा समावून न घेतल्याने करणार आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका, अधिकाचारिकी व वार्ड बॉय यांना पुन्हा सेवे समावून घेण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जीएमसीच्या अधिष्ठतांकडे केली आहे.

परंतु सदर मागणी पूर्ण होत नसल्याने कोविड योद्धा आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यासंबंधी राज्याच्या प्रधान सचिवांना निवेदनाच्या माध्यमातून दाद मागितल्यानंतर सुद्धा योग्य कार्यवाही होत नसल्याने कोरोना योद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.


गत नऊ महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या काळात कंत्राटी स्वरूपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात परिचारिका, अधिपरिचारिका व आरोग्य सेवकांची भरती करण्यात आली होती,

परंतु सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ ऑक्टोबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे संबंधितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, ही बाब कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या लक्षात आणून दिली आहे.

त्यानंतर सुद्धा सदर कोरोना योद्ध्यांना अद्याप सेवेमध्ये पूर्ववत करण्यात न आल्यामुळे त्यांना न्याय देऊन जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शून्य होईपर्यंत संबंधितांना पूर्ववत कामावर सामावून घेण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image