esakal | सावधान...! वृद्धांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Coronas greatest danger to the elderly!

सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच त्याचा सर्वाधिक धोका वृद्धांनाच असल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या १६७ रुग्णांपैकी ७९ रुग्ण हे ६० वर्षावरील असल्याने सर्वाधिक बळी वृद्धांचेच गेल्याचे दिसून येत आहे.

सावधान...! वृद्धांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका!

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला :  सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच त्याचा सर्वाधिक धोका वृद्धांनाच असल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या १६७ रुग्णांपैकी ७९ रुग्ण हे ६० वर्षावरील असल्याने सर्वाधिक बळी वृद्धांचेच गेल्याचे दिसून येत आहे.

रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व मधुमेह, उच्च-रक्तदाब आणि किडनी विकारासारख्या आजारांनी ग्रस्त असल्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. साधारणतः वयाने जेष्ठ असलेल्यांना यापैकी एखादा रोग असतो किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी असते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे त्यांना कोरोनाची लवकरच लागण होते. परंतु असे ज्येष्ठ कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांच्यासाठी कोरोना जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे २१ ते ३० वयोगटातील युवकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहत असल्याने व त्यांना कोणत्याच प्रकारची व्याधी नसल्याने त्यांना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडण्याचा धोका कमी असल्याचे दिसून येत आहे.

वयानुसार असे आहेत कोरोनाचे बळी
वय (वर्षे) मृत्यू
१ ते २० ००
२१ ते ३० ०२
३१ ते ४० ०४
४१ ते ५० २९
५१ ते ६० ५३
६० पेक्षा अधिक ७९

सकस आहार व व्यायाम आवश्यक
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यातुलनेत युवकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहत असल्याने ते कोरोनाला सहज हरवू शकतात. या स्थितीमुळे जेष्ठांसह युवकांनी रोज सकस आहार घेत व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

(संपादन - विवेक मेतकर)