esakal | Coronavirus: दंड भराच, पण मास्क तर लावा!, वाहनधारकांची धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Coronavirus: Pay the fine, but put on the mask!

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व नागरिक बिनधास्त रस्तावर विनामाक्स फिरताना दिसत असल्याने सोमवारी (ता.३०) शहरा पोलिसांनी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली.

Coronavirus: दंड भराच, पण मास्क तर लावा!, वाहनधारकांची धावपळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) ः शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व नागरिक बिनधास्त रस्तावर विनामाक्स फिरताना दिसत असल्याने सोमवारी (ता.३०) शहरा पोलिसांनी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली.

त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी एकूण ८० वेगवेगळ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे सोमवारी दिवसभर जवळपास सर्वच नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले दिसले.

करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. त्यात मास्कचा वापर हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरला तर करोना विषाणू संसर्ग बऱ्याच प्रमाणात थांबवता येणे शक्य आहे. त्यामुळे महापालिकेने मास्क न बांधणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वावगे, संजय घाटोल, टांगड यांनी केली.

(संपादन - विवेक मेतकर)