esakal | यंदा दसऱ्याला कम्युनिटी स्प्रेडचा धोका, करा दुरूनच नमस्कार !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Danger of community spread to Dussehra this year, say hello from afar!

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात सर्वच  एकत्र येतात. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने अर्थात आपट्याची पाने देत स्नेह, प्रेम व आपुलकी व्यक्त केली जाते.

यंदा दसऱ्याला कम्युनिटी स्प्रेडचा धोका, करा दुरूनच नमस्कार !

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात सर्वच  एकत्र येतात. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने अर्थात आपट्याची पाने देत स्नेह, प्रेम व आपुलकी व्यक्त केली जाते.

मात्र असे असले तरी ही आपट्याची पाने एकमेकांना दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दसऱ्याला आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात हस्तांरीत होत असतात. यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून तशी काळजी व्यक्त होत आहे.

खेडोपाडी शालेय विद्यार्थी घरोघरी जावून आपट्याची पाने देवून जेष्ठांना चरणस्पर्श करीत असतात. असा स्पर्श टाळण्याचे आवाहनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

सिमोल्लंघन तर गर्दी टाळा
दसऱ्याला सिमोल्लंघन आणि शमी वक्षाची पुजा करण्याची वर्षोनुवर्षेची प्रथा परंपरा आहे. सिमोल्लंघनासाठी गटागटाने एकत्रित गर्दी करीत सर्व बरोबरीने जातात. परततांना गाववेशीवरील शमी वक्षाचे पुजन होते.

बरेच ठिकाणी, रावण दहनाचाही कार्यक्रम होत असतात. हे सर्व धोकेदायक असल्याने या परंपरेलाशी यावर्षी शक्यतोवर नाही म्हणा.

एकंदरीत हर्ष, आनंद व उत्साह उल्लसित करणार्‍या दसर्‍याच्या पारंपारिक प्रथा कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने आनंदावर विरजण पडणार आहे. यामुळे आबालवध्दांमधून नाराजी तर व्यक्त होतच आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची अनेकांची तयारी आहे. 

(संपादन - विवेक मेतकर)

loading image