esakal | स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन, कंत्राटदार पडले तोंडघशी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Dengue-like disease in the mayors ward, no spraying in a month

शहर स्वच्छतेचे बाबतीत नगरपंचायत प्रशासन आणि कंत्राटदार दोघेही तोंड घशी पडले आहेत. साफसफाई आणि फवारणी साठी लाखो रुपयांचे कंत्राट दिलेले असताना शहरात डेंगू सदृश्य आजाराचा शिरकाव चिंतनाचा विषय बनला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन, कंत्राटदार पडले तोंडघशी

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : शहर स्वच्छतेचे बाबतीत नगरपंचायत प्रशासन आणि कंत्राटदार दोघेही तोंड घशी पडले आहेत. साफसफाई आणि फवारणी साठी लाखो रुपयांचे कंत्राट दिलेले असताना शहरात डेंगू सदृश्य आजाराचा शिरकाव चिंतनाचा विषय बनला आहे.

सत्ताधारी सदस्यांनी कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याबाबत दिलेले निवेदन झाकण्याचा प्रकार तर नाही ना, असा प्रश्नही आरोग्याचे बाबतीत उद्भवलेल्या परिस्थिती वरून निर्माण होत आहे. ज्या वॉर्डात डेंगू सदृश्य आजाराचा प्रसार होत आहे, त्या भागात महिनाभरात एकही फवारणी झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


एकीकडे नगर पंचायतकडून ज्या कंत्राटदाराला घनकचरा व्यवस्थापनचे कंत्राट दिले गेले, तो चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने सर्व कारभार मोबाईल टू मोबाईल होत असल्याने नगर पंचायतच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण होत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काही भागात गावातील काही तरुण व नागरिक साफसफाईसाठी पुढाकार घेत असल्याचे सत्ताधारी सदस्यांच्या निवेदनावरून स्पष्ट होत आहे.

मग दरमहा स्वच्छतेवर होणाऱ्या खर्चाचे काय? या संदर्भात नागरिकांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण होत आहे. यातील नेमके खरे खोटे काय याचा खुलासा नगर पंचायत कडून होणे गरजेचे आहे. ता.२९ सप्टेंबरला नगर पंचायतच्या १७ नगरसेवका पैकी १२ नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदनद्वारा सूचित केले.

त्या निवेदनात शहरात घटां गाडीवरून स्पीकरद्वारे जो प्रचार आणि प्रसार केला जात आहे, त्यामध्ये नगर पंचायतचा कुठेही उल्लेख केला जात नाही. सदर साफसफाई आणि फवारणीचे काम नगर पंचायतने नेमलेल्या भगत प्लास्टिक (चंद्रपूर जिल्हा) यांचे आहे. मात्र कंत्राटचा कार्यारंभ दिल्यापासून शहरात सदर कंत्राट दाराकडून कामे केली जात नाहीत.

एक सामाजिक संघटना काम करताना नागरिकांना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या नगर पंचायतमधून लाखो रुपये खर्च होत आहे, त्याच नगर पंचायतीचे कंत्राटदाराकडून कुठेही साधे नाव सुद्धा घेतले जात नाही. यावरून सदर कंत्राटदाराला नगर पंचायतचे काहीही सोयरसुतक नसावे म्हणून भगत प्लास्टिक नावाचे कंत्राट रद्द करण्यात यावे, असे निवेदन सत्ताधारी नगरसेवकांनी दिले आहे.


आरोग्य विभागाने केले सर्वेक्षण
संग्रामपूर नगर पंचायतमधील साफसफाईचा चांगलाच गाजत असताना नगराध्यक्षाचे वॉर्ड न. ५ (गजानन नगर) मध्येच ता.२९ सप्टेंबरला ७ ते ८ डेंगूसदृश्य आजाराचे रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. तालुका आरोग्य विभागाला माहिती मिळताच कर्मचारी वर्गाने या परिसरातील ३० ते ३५ घरात जाऊन सर्वेक्षण केले व त्यात डेंगू सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या हिशोबाने या परिसरातील साफसफाई सांडपाणी , नाल्याची सफाई आदी बाबत तालुका आरोग्य विभागाने नगर पंचायतीला पत्रव्यवहार केल्याची ही माहितीतालुका आरोग्य अधिकारी डॉय मयूर वाडे यांनी दिली आहे.

संग्रामपूर शहरात नगरपंचायतचे अध्यक्ष त्यांचे सहकारी नगरसेवक,आरोग्य समितीचे अध्यक्ष यांचे लक्ष नसल्याने संग्रामपूर मधील गजानन नगरात एकाच कुटुंबात पाच जणांना डेंग्यु सदृश्य आजारची लागण झाली आहे. अशीच डेंगीची साथ वाढली व कोणाचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार अध्यक्ष याचेसह सर्वच नगरसेवक नगरपंचायतलाच जबाबदार धरू.
- विलासराव भास्करराव देशमुख, नागरिक वॉर्ड न. ५, संग्रामपूर

(संपादन - विवेक मेतकर)