चॅलेंजच्या ‘मिसयुज’चा धोका!, सोशल मीडियावर ‘कपल चॅलेंज’सह अनेक चॅलेंजचा धुमधडाका

विरेंद्रसिंह राजपूत
Wednesday, 30 September 2020

वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत फोटो टाकण्याचा ट्रेंड सध्या जोमात सुरू आहे. मात्र, अशा चॅलेंज अंतर्गत टाकलेल्या या फोटोंचा सायबर हॅकर्सकडून ‘मिसयुज’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातच महिलांनी यादृष्टीने अधिक काळजी घेण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञानी व्यक्त केले आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत फोटो टाकण्याचा ट्रेंड सध्या जोमात सुरू आहे. मात्र, अशा चॅलेंज अंतर्गत टाकलेल्या या फोटोंचा सायबर हॅकर्सकडून ‘मिसयुज’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातच महिलांनी यादृष्टीने अधिक काळजी घेण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञानी व्यक्त केले आहे.

गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कपल चॅलेंज’ नावाची मोहीम सुरू आहे. यात पतिपत्नी यांचे एकत्रित फोटो टाकले जातात. सोशल नेटवर एक्टीव्ह असलेल्यांकडून यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे.

मात्र हे धोकादायक असल्याचे सायबर तज्ज्ञ यांनी म्हंटले आहे. लॉकडाऊनच्या काळात अशा चॅलेंज वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी साडी चॅलेंज, नथनी चॅलेंजची सोशल मीडियावर धूम होती.

महिलांनी वेगवेगळ्या पोझमध्ये आपले फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले होते. तर सध्या कपल चॅलेंज नावाचे ट्रेंड सुरु आहे. यात पतिपत्नी यांनी स्वतःचे एकत्रित असलेले फोटो टाकले जात आहेत. एकाने फोटो टाकला कि त्याचे पाहून इतरांकडूनही स्वतःचे फोटो अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात काही क्षणांचा आनंद जरी मिळत असला तरी हे धोकादायक ठरू शकते असे सायबर तज्ञाचे म्हणणे आहे.

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार स्वतःचे व्यक्तिगत फोटो सोशल मीडियावर अपलोड करून नये. अनेकवेळा आपण कुठे आहोत, काय करत आहोत, याचे लोकेशन व माहिती टाकण्याचा मोह अनेकांना असतो. सायबर हॅकर्स किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडून याचा मिसयूज होऊ शकतो.

कोणी बाहेरगावी असल्याचे लोकेशन टाकल्यास किंवा कोणी सिनेमा पहायला गेले असल्यास त्या वेळेत घरी चोरीच्या घटना किंवा अन्य गुन्हेही घडू शकतात. यादृष्टीने टाकायची इच्छा असेलच तर आपले काम झाल्यानंतर ती माहिती अपलोड करावी.

महिलांनी अधिक काळजी घ्यावी !
सोशल मीडियावर स्वतःचे फोटो टाकल्यास या फोटोंचा गैरवापर करण्याचाही धोका संभवतो. विशेषतः महिलांनी याबाबत अधिक सतर्क असायला हवे. फोटो 'मॉर्फिंग' करून त्याचा अडल्ट साईटवर किंवा इतर ठिकाणी वापर होऊ शकतो, यासाठी आपले वैयक्तीक फोटो अपलोड करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बहुतेक 'चॅलेंज' हे हॅकर्सकडून अपलोड केले जातात त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे केव्हाही चांगले.असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आपली प्रोफाईल ‘सेफ’ ठेवा
आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर टाकताना काळजी घेणेच उत्तम. तरी टाकण्याची इच्छा असलीच तर आपले सोशल मीडियाचे प्रोफाइल सुरक्षित ठेवावे. आपले फोटो एकमेकांसोबत शेअर करण्यास काही चूक नाही. मात्र ते आपल्या ओळखीच्या लोकांमधेच शेअर व्हायला हवे. अनोळखी लोक या फोटोंचा ‘मिसयुज’ करू शकतात. म्हणून फ्रेंड्स निवडताना काळजी घ्यावी, अननोन लोकांना ॲड करू नये. आपल्या फ्रोफाईल फोटोला गार्ड टाकावे, अकाउंट ओन्ली फ्रेंड्स ठेवावे, त्यातच ओपन सोर्सवर फोटो अपलोड केल्यास कोणीही याचा वापर करून शकते. सोशल मीडियाचा आनंद सुरक्षितपणे घ्यावा.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Danger of Misuse of Challenge !, Challenge of many challenges including Couple Challenge on social media