जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष कोरपेंची फेरनिवड

Akola News District Central Cooperative Bank Chairman Reelection of Dr.Santosh Korpe
Akola News District Central Cooperative Bank Chairman Reelection of Dr.Santosh Korpe

अकाेला :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बुधवारी विनबिरोध झाली. अध्यक्षपदी डाॅ. संताेष काेरपे यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी कारंजा लाड येथील श्रीधर कानकिरड यांची निवड करण्यात आली. जिल्हा बँकेवर डॉ. कोरपे गटाच्या सहकार पॅलनचे निर्विवाद वर्चस्व मिळविली आहे. वाशीम जिल्ह्याला यावर्षीही उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले आहे.
अकाेला व वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी ता. २० फेब्रुवारी राेजी मतदान झाले हाेते. या निवडणुकीत डॉ. कोरोपे गटाचे २१ पैकी १२ सदस्य बिनविरोध निवडून आले होते, तर नऊ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. ता. २१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. त्यात बँकेवर सत्ता असलेल्या विद्यमान सहकार पॅलनने वर्चस्व कायम ठेवले हेाते. बुधवार, ता. ३ मार्च राेजी बँकेच्या अकोला येथील मुख्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. दाेन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड अविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनायकराव कहाळेकर, सहकार अधिकारी (श्रेणी-२) याेगेश लाेटे यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली.
...............................
महिला संचालकांना डावलले
जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत तीन संचालक निवडून आल्या आहेत. या तिन्ही महिला सातत्याने तीनपेक्षा जास्त वेळ विजयी झाल्या आहेत. त्यामुळे अनुभवात त्या इतर संचालकांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. असे असतानाही पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत महिला संचालकांना डावल्यात आले असल्याचे दिसून आले. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून अकाेला जिल्ह्यातील भारती गावंडे व वाशीम जिल्ह्यातील मंदा चाैधरी, तर सेवा सहकारी मतदारसंघातून तेल्हारा येथील रुपाली खाराेडे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आल्या आहेत. यावेळी तीन पैकी एका महिला संचालकांना किमान उपाध्यक्षपदासाठी संधी मिळेल याबाबत बँक वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही महिलांना डावलण्यात आले.
............................
निवृत्त बँक कर्मचाऱ्याला संधी
डिल्हा बँकेतून निरीक्षक या पदावरून निवृत्त झालेले कारंजा येथील श्रीधर कानकिरड यांना बँकेचे संचालक होण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांची थेट उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ते सन १९८७ मध्ये बँकेतून निवृत्त झाले हाेते. शेतकरी कामगार पक्षात सक्रिय असून, वाशीम जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी सभापतीपद भूषविले आहे. कानकिरड हे जिल्हा बँकेच्या संचालक पदावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com