esakal | तुमचे हृदय 28 टक्केच काम करीत आहे, डोळे तपासायला गेलेल्या आजीबाईंची केली डॉक्टरांनीच दिशाभूल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Doctors misled by showing heart damage

वैद्यकीय व्यवसायाशी प्रामाणिक न राहता रुग्णांची दिशाभूल करण्याचे प्रकार अकोला शहारातील काही प्रतिष्ठित हॉस्पिटलकडून सुरू आहेत. अशी दिशाभूल डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या एका महिला रुग्णाची करण्यात आल्याबद्दल ता. २१ ऑक्टोबर रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तुमचे हृदय 28 टक्केच काम करीत आहे, डोळे तपासायला गेलेल्या आजीबाईंची केली डॉक्टरांनीच दिशाभूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : वैद्यकीय व्यवसायाशी प्रामाणिक न राहता रुग्णांची दिशाभूल करण्याचे प्रकार अकोला शहारातील काही प्रतिष्ठित हॉस्पिटलकडून सुरू आहेत. अशी दिशाभूल डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या एका महिला रुग्णाची करण्यात आल्याबद्दल ता. २१ ऑक्टोबर रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


अकोला येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. थोरात यांच्याकडे वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मण वाडा येथील रहिवाशी अनुसयाबाई पंढरी घुगे (वय ७३) या डोळ्याची शस्रक्रिया करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे वय बघता त्यांना आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

त्यानुसार त्या आयकॉन हॉस्पिटलमधील डॉ. बिनित सिन्हा यांच्याकडे तपासणीसाठी गेल्यात. तेथे त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे हृदयाचा आजार असल्याने व २८ टक्केच काम करीत असल्याने त्यावर उपाचर केल्याशिवाय डोळ्याची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे सांगितले.

आयकॉन हॉस्पिटल सारख्या प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या या अभिप्रायामुळे घाबरलेल्या घुगे परिवारातील सदस्यांनी डॉ. केदार यांच्याशी संपर्क साधला. डॉ. केदार यांच्याकडे तपासणी केल्यानंतर रुग्णाचे एल.व्ही.ई.एफ. ६० टक्के कार्यरत असल्याने डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास हरकत नसल्याचा सल्ला दिला. त्यानुसार ५ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली व आता त्यांचा डोळा चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.

या सर्व प्रकारात आयकॉन हॉस्पिटलचे डॉ. बिपीन सिन्हा व ते जेथे कार्यरत आहेत त्या आयकॉन हॉस्पिटलकडून रुग्णाची दिशाभूल करीत व फसवणूक केल्याची तक्रार अनुसयाबाई घुगे यांनी २१ ऑक्टोबर २०२० रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनुसार रामदास पेठे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image