कोविड भत्ता मिळाला नाही म्हणून डॉक्टरांनी केले आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १२४ आंतरवासिता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड भत्ता मिळावा यासाठी काम बंद केले होते.

अकोला   ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १२४ आंतरवासिता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड भत्ता मिळावा यासाठी काम बंद केले होते.

अखेर सोमवारी डॉक्टरांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध वार्डामध्ये सेवा देणाऱ्या १२४ आंतरवासिता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड भत्ता मिळावा या मागणीसाठी एक ऑक्टोबर पासून वार्डातील काम बंद आंदोलन सुरू केले होते.

त्यामुळे मेडिकल कॉलेजची रुग्णसेवा अडचणीत आली होती. या आंदोलनावर चार दिवसांनी तोडगा निघाला आहे. डॉक्टरांनी सोमवारी (ता. ५) मेडिकलचे प्र. अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांची भेट घेऊन विषय लक्षात आणून दिला.

त्यानंतर घोरपडे यांनी आंतरवासिता डॉक्टरांना भत्ता देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. लवकरच या संदर्भात ठोस निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंतरवासिता प्रशिक्षणार्थी डॉक्टर वार्डात सेवा देण्यासाठी परतले आहेत. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Doctors staged agitation as covid did not get allowance