
करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनव्दारे शिक्षण देण्यात येत आहे.
शेगाव (जि.बुलडाणा) : करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनव्दारे शिक्षण देण्यात येत आहे.
मात्र , जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील समाजसेवक अमित जाधव यांनी पुढाकार घेत अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.
त्यांनी ‘डोनेट डिव्हाईस’ चळवळ सुरु करत घरी पडून असलेले जुने व नादुरुस्त अँड्रॉईड मोबाईल दान करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार जमा झालेले मोबाईल जिल्हयातील आदिवासी पट्ट्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
सध्या करोनामुळे जगभर शिक्षणाचे व्हर्च्युअल क्लासेस सुरे झाले आहेत. वर्गातील शाळा घरांमध्ये भरू लागली आहे. शहरात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण शक्य आहे. मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात ३ लाखाच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी फक्त ४० टक्के विद्यार्थ्याकडे ऍन्ड्राईड मोबाईल उपलब्ध आहे. जवळपास ६० टक्के विद्यार्थाकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधन उपलबध नाहीत.
अश्या विद्यार्थ्यंसाठी अमित जाधव यांनी “डोनेट ए डिव्हाईस” चळवळ राबवून ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी पाऊले उचलली आहे. संग्रामपूर तालुक्यातील काही आदिवासी गावातील तर काही शेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना हे मोबाईल वितरित करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे गोरगरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात ठरणार आहे.
‘डोनेट अ डिव्हाईस’
ग्रामीण भागातील गरीब, गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळणेसाठी सुस्थितीत असणारे जुने मोबाईल, लॅपटॉप, संगणक, स्माट टिव्ही दान करावयाचे आहे. सदरचे साहित्य ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
नादुरुस्त किंवा जुना अँड्रॉइड मोबाईल करा गरीब विद्या्र्थ्यांसाठी करा दान
'कोरोना'मुळे शाळा कधी सुरू होईल माहिती नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला आहे. मात्र, असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे एंराॅईड फोन नसल्याने ते ऑनलाईन शिक्षण ही घेऊ शकत नाहीत. त्यासाठी शेगावच्या समाजसेवक अमित जाधव यांनी गरीब विद्या्र्थ्यांसाठी करा दान नागरिकांना त्यांचे नादुरुस्त किंवा जूने एंराॅईड स्मार्टफोन दान करण्याचे आवाहन केले आहे.
बरेच नागरिक नवीन अँड्रॉइड फोन विकत घेताना आपला जुना फोन एक्सचेंज ऑफरमध्ये खूप कमी किंमतीत दुकानदारांना देता. पण हा जुना अँड्रॉइड फोन आमच्या शाळेला देणगी म्हणून दिली तर कोविड मुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळांमार्फत आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. शेकडो विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यांना स्मार्ट फोन उपलब्ध झाल्यास ती मोठी मदत ठरणार आहे तुमच्या मदतीमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची संधी मिळेल, असे आवाहनहि जाधव यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)