पंधरा हजार गरीबांच्या घराचे स्वप्न होणार साकार

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 3 November 2020

गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात १५ हजार ४८२ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न साकार होईल.

अकाेला   ः गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात १५ हजार ४८२ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न साकार होईल.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासह इतर मागासवर्गीय घटकातील नागरिकांचे राहणीमान उंचवावे आणि त्याच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना (ग्रामीण) सुरू केली आहे. याेजनेंतर्गत गरीबांना त्यांच्या जागेवर घरकुल बांधून देण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा काही प्रमाणात खर्च हा शासनामार्फत अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येतो.

त्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात गरीबांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ४०७ लाभार्थ्यांना, अनुसूचित जमातीच्या १३७ व १४ हजार ८७५ इतर मागासप्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल. याव्यतिरीक्त सदर उद्दिष्टाच्या ५ टक्के लाभ अपंग लाभार्थ्यांंना देण्यात येईल.

असे आहे पं.स. निहाय निश्चित उद्दिष्ट
अकोला तालुक्यातील लाभार्थ्यांना २ हजार ७५२, अकोट तालुक्यातील लाभार्थ्यांना ३ हजार ६३७, बाळापूर २ हजार १३५, बार्शीटाकळी १ हजार २०, मूर्तिजापूर १ हजार ८८९, पातूर १ हजार २७८, तेल्हारा तालुक्यातील २ हजार ७७१ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना ४०७, अनुसूचित जमातीच्या १३७ व इतर मागासवर्गीयांना १४ हजार ८७५ घरकुलांचा लाभ देण्यात येईल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The dream of a house for 15,000 poor people will come true