MSRTC : एसटीचा अ‍ॅक्शनमोड! राज्यभरातील सर्व चालकांची होणार मद्यपान चाचणी, हे आहे कारण..

शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत राज्यभरातील सर्व १०० टक्के चालकांची मद्यपान चाचणी केली जाणार आहे.
nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtcesakal

अकोला - राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे वाढते अपघात लक्षात घेतत बस चालकांची मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम गुरुवारी (ता.३१) पहाटे ५ वाजतापासून सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत राज्यभरातील सर्व १०० टक्के चालकांची मद्यपान चाचणी केली जाणार आहे.

चालकांनी रा.प कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबाबतची प्रकरणे अलिकडच्या काळात आढळून आली. रा. प. महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशीन दिल्या असताना स्थानकावर, तसेच मार्गतपासणी दरम्यान मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी होत नाही. याबाबतचे परिपत्रकच काढण्यात आले होते.

त्याची अंमलबजावणी होत नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. त्यामुळे आता महामंडळातील सर्व मार्गावरील प्रामुख्याने महामार्गावरील बसेस मध्यम व लांब पल्यांच्या बसेस, रात्रीच्या प्रवास करणाऱ्या बसेस यावरील चालकांची १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी दोन दिवसांची मोहीम राबविली जात आहे.

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
Parbhani News : शिक्षणासाठी मुलींची पायपीट;दिडशेवर मुली शाळेत जातात चालत

सुरक्षा व दक्षता शाखा व वाहतूक शाखा यांच्यासह संयुक्त तपासणी कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जात आहे. त्याला

गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून सुरुवात झाली असून, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यत ही तपासणी मोहीमा राबविली जाणार आहे. त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयामार्फत एकत्र करून राज्यभरातील मद्यपी चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
Nanded News : नशा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर...

दारव्हा स्थानकाच्या चालकामुळे ओढवली नामुष्की

राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आगाराचा बस चालक काही दिवसांपूर्वी मद्यपान करून संभाजीनगरकरिता बस घेवून जात होता. अतिमद्यपानामुळे बस चालवित असतानाच त्याची शुद्ध हरविली व तो स्टेरिंगवरच डोके ठेवून झोपला.

nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
अबब..! झेडपीतील १९४६० जागांसाठी १४.५१ लाख अर्ज; तिजोरीत १४५ कोटी जमा; शिक्षक भरती नसल्याने DEd, BEd केलेल्या उमेदवारांचेही अर्ज

त्यामुळे बसमधील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला होता. महामंडळावर बदनामीच नामुष्की ओढविली होती. या प्रकारानंतर चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे बस चालक व वाहकांमधील मद्यपानाचे गंभीर प्रकार लक्षात घेवून रा.प. महामंडळाने सर्व चालक व वाहकांची मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com