esakal | बोंड अळीचा परिणाम;१८ एकरातील कपाशीत घातली मेंढरं
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Effect of Bond larvae; sheep planted in 18 acres of cotton

जिल्ह्यातील कापूस क्षेत्र यंदा बोंडअळीने पोखरले आहे. यात प्रामुख्याने ओलिताची कपाशी असलेल्या शेतांमध्ये बोंडअळीने धुमाकूळ घातला आहे.

बोंड अळीचा परिणाम;१८ एकरातील कपाशीत घातली मेंढरं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बोर्डी (जि.अकोला)  : जिल्ह्यातील कापूस क्षेत्र यंदा बोंडअळीने पोखरले आहे. यात प्रामुख्याने ओलिताची कपाशी असलेल्या शेतांमध्ये बोंडअळीने धुमाकूळ घातला आहे.

झाडांवर बोंड दिसत असतानाही त्यातून कापूस येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हे पीक उपटून टाकत आहेत. काही शेतकरी जनावरे चरायला सोडत आहेत. मंगळवारी (ता.२४) बोर्डी शिवारात अमोल ताडे या शेतकऱ्याने कपाशीत मेंढरे चरायला सोडली.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी


ताडे यांनी यंदा १८ एकरात कपाशीची लागवड केली होती. पावसामुळे पीक चांगले वाढले. झाडांवर बोंडही मोठ्या संख्येने दिसत होते. परंतु कापूस वेचणीची वेळ आली तेव्हा त्यातून चांगला कापूस निघणे अवघड झालेले आहे.

त्यांना ज्या शेतातून एकरी १५ क्विंटलची कपाशीची अपेक्षा वाटत होती त्याच शेतात केवळ एकरी तीन क्विंटल कापूस निघाला. सद्यस्थितीत झाडांवर ३५ ते ४० बोंड परिपक्व झालेले दिसून येतात. मात्र यामध्ये प्रत्येक बोंडात अळीने उच्छाद घातल्याने आता कापूस निघण्याची शक्यता मावळली.

हेही वाचा - सरपंचपदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

हे पाहता त्यांनी पीक हिरवेगार असतानाही शेतात मेंढरे सोडली आहेत. कपाशीच्या व्यवस्थापनावरच एकरी २० हजारांवर खर्च झालेला आहे. एकरात तीन क्विंटल उत्पादन आले असून यातून खर्चही निघणे कठीण आहे.

कपाशी पिकाला विमा मदत मिळावी, शासनाने पाठबळ द्यावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करीत आहेत. यंदा या भागातील शेतकऱ्यांचा संपुर्ण हंगाम बोंड अळीमुळे हातातून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या उभे असलेले पीक उपटून रब्बीत दुसरे पीक लावण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

कापूस पिकासाठी यंदा एकरी २५ हजारापर्यंत खर्च झाला. बोंडअळीसाठी पाच ते सहा फवारणी कराव्या लागल्या. फेरोमोन ट्रॅप लावूनही फायदा झाला नाही. यंदा लागवड केलेल्या १८ एकरात सरासरी तीन ते चार क्विंटल पर्यंत उत्पादन झाले. आता सर्वत्र बोंडअळी वाढल्याने उत्पादन येण्याची चिन्हे नव्हती. परिणामी मेंढरे सोडण्याचा निर्णय घेतला.
- अमोल ताडे, कापूस उत्पादक, बोर्डी, जि. अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

loading image