esakal | अतिवृष्टीचा निधी तहसीलदारांच्या खात्यात
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Excess rain funds in tehsildars account

जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पहिल्या हप्त्यांची मदत २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

अतिवृष्टीचा निधी तहसीलदारांच्या खात्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला   ः जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पहिल्या हप्त्यांची मदत २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिली आहे. सदर निधीचे विभाजन करुन निधी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार होताच त्यांच्या खात्यात दुष्काळी मदत जमा करण्यात येईल.

यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनला, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले. झाडांची पडझड, बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते.

त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मदत निधीच्या पहिल्या हप्त्याचे २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. सदर निधीचे विभाजन करुन तो तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेती खरडून गेल्यामुळे ९९ लाख ९९ हजारांची मदत
जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाळापूर व पातूर तालुक्यातील शेत जमीन खरडून गेली होती. त्यामुळे शासनाने शेत जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मदत दिली आहे. त्याअंतर्गत बाळापूर तालुक्यासाठी ९८ लाख ७ हजार व पातूर तालुक्यासाठी १ लाख ९२ हजार रुपयांची मदत तहसीलदारांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.


तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आलेला निधी
तालुका निधी
अकोला ५ कोटी ६६ लाख ३ हजार
बार्शीटाकळी १ कोटी ४२ लाख ९५ हजार
अकोट ५ कोटी १८ लाख २२ हजार
तेल्हारा ३ कोटी १८ लाख ७ हजार
बाळापूर ७ कोटी २७ लाख ७८ हजार
पातूर १ कोटी ६२ लाख २७ हजार

एकूण २६ कोटी ७८ लाख ७३ हजार
(संपादन - विवेक मेतकर)

loading image