
बांधावरील झाडाची मुळी कापण्यावरून झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाल्याची घटना सावखेड भोई शिवारात शुक्रवारी घडली. या प्रकरणात सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे
देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) ः बांधावरील झाडाची मुळी कापण्यावरून झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाल्याची घटना सावखेड भोई शिवारात शुक्रवारी घडली. या प्रकरणात सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे
सावखेड भोई येथील धम्मपाल मोतीराम जाधव आपल्या शेतात पत्नी भावजय आणि मुलासोबत शेतकाम करीत होते. त्यावेळी शेतावरील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाची मुळी शेतात विखुरल्याने कुऱ्हाडच्या साह्याने त्यांनी तोडून टाकली. शेजारी असलेल्या शेतमालक प्रभू दगडू शेळके यांनी बांधावरील झाडाची मुळी का तोडली म्हणून वाद घातला.
नंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादी, फिर्यादीची पत्नी मुलगा व भावजय यांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणात धम्मपाल मोतीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रभू दगडू शेळके, सुखदेव बाबुराव गांधीले, नारायण बाबुराव गांधीले, बाबुराव तुकाराम गांधीले, पवन प्रभू शेळके, कुंडलिक अर्जुनराव मुळे व विनायक सुखदेव गांधीले यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
(संपादन - विवेक मेतकर)