उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेऊन शेतकऱ्याला मारहाण

अनिल दंदी
Wednesday, 14 October 2020

कपाशीच्या पिकातून ट्रॅक्टर व मळणी यंत्र चालवित नेल्याने कपाशीचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रकरणी शेतकऱ्याने बाळापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळापूर (जि.अकोला) : कपाशीच्या पिकातून ट्रॅक्टर व मळणी यंत्र चालवित नेल्याने कपाशीचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रकरणी शेतकऱ्याने बाळापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळापूर तालुक्यातील नांदखेड टाकळी येथील विपूल घोगरे या शेतकऱ्याचे टाकळी कुरेशी शेतशिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात कपाशी आहे. गावातील विनोद कवळकार याने घोगरे यांच्या उभ्या कपाशी पिकाच्या शेतातून ट्रॅक्टर व मळणीयंत्र चालवित नेले असा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे.

ता. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता विपुल घोगरे हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार समजला. पिकातून ट्रॅक्टर नेल्याने पिकाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत शेतकरी विपूल घोगरे यांनी विनोद कवळकार याला हटकले असता विनोदने घोगरे यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत घोगरे जखमी झाले असून, घोगरे यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीची दखल घेत बाळापूर पोलिसांनी आरोपी विनोद कवळकार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmer beaten with a tractor in the field