
कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले.
अकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
. परंतु त्यानंतर सुद्धा सुधारीत पैसेवारीची ‘उत्तम’ मोहर लागल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सरकारी सवलती मिळण्याचा मार्ग खडतर झाला आहे. खरीपातील लागवडी याेग्य ९९० गावांचे निरीक्षण केल्यानंतर प्रशासनाने पैसेवारी जाहीर केल्याने अतिवृष्टी, किडींचा हल्ला व अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैसाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे.
हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते.
यानंतर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ६७ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
शासनाने जाहिर केलेली पैसेवारी तसेच कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले.