esakal | शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, आज भाजपचे चून भाकर आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Farmers Diwali in the dark, BJP agitation today

महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, आज भाजपचे चून भाकर आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे.

कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले

परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे.

शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा व भाजपा किसान मोर्चा तहसील तहसील कार्यालय व अकोला जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर १३ नोव्हेंबरला शेतकरी धरणे सकाळी साडे अकरा ते दोन वाजता पर्यंत, चुन भाकर खातील आणि तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील. या आंदोलनात सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, महापौर अर्चना मसने, किशोर पाटील आदींनी केले आहे.


या मागण्यांसाठी आंदोलन
- सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहूला २५ हजार व बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी.
- केंद्राच्या एमएसजी कायद्यान्वये भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र सुरू करा, दिवाळीतही खरेदी सुरू ठेवावी.
- यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे, म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.
- संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विमाचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने निकष कायम करण्यात यावे.
- किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.
- ट्रान्सफार्मर जळला तर नादुरुस्त ट्रान्सफार्मर २४ तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.
- रासायनिक खते, बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.
- कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.
- अकोला जिल्ह्यावर झालेला अन्याय दूर करून त्वरित मदतीच्या रकमेमध्ये वाढ करावी.

(संपादन - विवेक मेतकर)