पंचायत समितीचे आणखी चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

सुगत खाडे  
Saturday, 5 September 2020

कोरोना विषाणू संसर्गाचे अकोला पंचायत समितीमधील चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासह एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पंचायत समितीमध्ये कृषी विभागात कार्यरत विस्तार अधिकारी गुरुवारी (ता. ३) पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी (चा. ४) अकोला पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या रॅपिड ॲंटीजन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये इतर कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

 

अकोला   ः कोरोना विषाणू संसर्गाचे अकोला पंचायत समितीमधील चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासह एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पंचायत समितीमध्ये कृषी विभागात कार्यरत विस्तार अधिकारी गुरुवारी (ता. ३) पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी (चा. ४) अकोला पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या रॅपिड ॲंटीजन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये इतर कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. महानगरातून शहर व आता गाव खेड्यात पोहचलेल्या कोरोनाने शासकीय कार्यालयात सुद्धा शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. अकोला पंचायत समितीमधील कृषी विभागात कार्यरत कर्मचारी गुरुवारी (ता. ३) कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

गुरुवारी (ता. ३) पंचायत समितीमधील कक्षांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर कक्षाला सिल करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी (ता. ४) इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने पंचायत समितीत कोरोना तपासणीसाठी रॅपिड अंटीजन टेस्टचे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात ५९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५२ अहवाल निगेटिव्ह आले, तर ४ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये आरोग्य, रोजगार हमी, सामान्य प्रशासन विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्यासह एका परिचराचा सुद्धा समावेश आहे.

सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांची रॅपिड टेस्ट केली असता घरातील तीन सदस्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकारानंतर शुक्रवारी अकोला पंचायत समितीचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. त्यासह अभ्यांगतांना पंचायत समितीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Four more Panchayat Samiti employees corona positive