
सुमारे चारशे वर्षांनंतर घडून येणारी सूर्यमालेतील दोन ग्रहांची भेट सर्वात कमी अंतरावरून एकमेकाजवळ दिसणारे गुरू आणि शनी ग्रह खुपच मनोहारी दर्शन देताना दिसत होते.
अकोला: सुमारे चारशे वर्षांनंतर घडून येणारी सूर्यमालेतील दोन ग्रहांची भेट सर्वात कमी अंतरावरून एकमेकाजवळ दिसणारे गुरू आणि शनी ग्रह खुपच मनोहारी दर्शन देताना दिसत होते.
विश्वभारती विज्ञान केंद्र, नेहरूपार्क द्वारा आयोजित या कार्यक्रमाचा आनंद अकोलेकरांनी अनुभवला असून प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाधिकारी प्रा.खडसे, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता घोरपडे, संजय देशमुख, प्रकाश अंधारे, बी.एस.देशमुख, प्रभाकर दोड, विजय देशमुख, प्रा.अभिजित दोड, रमेश डागा आदी उपस्थित होते.
२२ डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवसाची ही मोठी घटना उपस्थितांना दुर्बिणीच्या माध्यमातून बघताना एक आगळीवेगळी अनुभूती अनुभवली.
आता अशा प्रकारची घटना 2080 यावर्षी अनुभवता येईल.
बहूसंख्य लोकांनी या दुर्मीळ व महत्वपूर्ण खगोलीय घटनेचा आनंद नुसत्या डोळ्यांनी सुध्दा अनुभवला. तसेच काहींचे अंतर वाढत असताना आणखी चार - पाच दिवस हा अनुभव घेता येईल, अशी माहिती विश्वभारतीचे प्रभाकर दोड याांनी दिली आहे.