esakal | टॅक्स भरत असाल तर मिळणार एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर आणि भन्नाट बक्षीसं
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Prize lottery for the citizens who pay taxes of Lonar Municipality

मालमत्ता करात आधी सूट दिली, नंतर कर बुडव्यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवले तरीही काही लोक मालमत्ता कर भरण्यात टाळाटाळ करत असल्याने या कर बुडव्यांना अद्दल घडविण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी शक्कल लढवली होती. यामध्ये कर बुडव्यांच्या घरातील दुचाकी, चारचाकी, फर्निचर, टीव्ही, एसी आणि फ्रिज जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

टॅक्स भरत असाल तर मिळणार एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर आणि भन्नाट बक्षीसं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणार (जि.बुलडाणा) : मालमत्ता करात आधी सूट दिली, नंतर कर बुडव्यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवले तरीही काही लोक मालमत्ता कर भरण्यात टाळाटाळ करत असल्याने या कर बुडव्यांना अद्दल घडविण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी शक्कल लढवली होती. यामध्ये कर बुडव्यांच्या घरातील दुचाकी, चारचाकी, फर्निचर, टीव्ही, एसी आणि फ्रिज जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

एवढच काय तर कोणत्याही नगरपालिका किवा महानगरपालिकेपूढे कर वसुलीचं मोठं आव्हान असतं.  मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार नगरपालिकेने याहूनही भन्नाट शक्कल लढविली आहे.  लोणार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी 31 जानेवारी 2021 पर्यत मालमत्ता धारक व पाणी कराचा संपूर्ण भरणा करतील अशा करदात्यांचा लकी ड्रॉ सोडतीव्दारे लाखो रुपयाचे बक्षिसे देण्याचे नियोजन केले आहे.

याबाबत नगराध्यक्षा पूनम मनीष पाटोळे, उपाध्यक्ष नूरमहंमद खान बादशाखान पठाण, कॉग्रेसचे गटनेते भूषण मापारी, शिवसेना गटनेते प्रा. बळिराम मापारी सह सर्व सभापती नगरपालिका सदस्यांना कोरोना काळात थकलेल्या प्रचंड कर वसुली बाबत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सविस्तर चर्चा केली.

त्या अनुषंगाने याबाबत चा ठराव सुद्धा नगरपालिका मध्ये घेण्यात आला असून 31 जाने 2021 पर्यत जे मालमत्ता धारक , व पाणी करधारक संपूर्ण कराचा भरणा करतील यांचा लकी ड्रॉ करत एकूण 45 बक्षिसे देणार आहेत

पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 40 इंची एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस 180 लिटर फीज, तिसरे बक्षीस कुलर, चौथे बक्षीस गॅस शेगडी, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर, सहावे बक्षीस 5 पंखे , सातवे 5 इस्त्री, आठवे 10 हेल्मेट, नववे 10 मुलाचा स्टडी टेबल, दहावे बक्षीस 10 इडली मेकर अशा प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.  

सर्व मालमत्ता धारकांना एक आकर्षक कापडी पिशवी भेट देण्यात येणार असून आदर्श कर दाता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशा अभिनव उपक्रम राबवीत असून या संधीचा शहरातील करदात्यांनी लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल केदारे यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image