
महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर लातूरचे विद्यमान जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची मुंबईला बदली करण्यात आल्याने हे पद रिक्त झाले होते.
अकोला, :: महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर लातूरचे विद्यमान जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची मुंबईला बदली करण्यात आल्याने हे पद रिक्त झाले होते. सोमवारी (ता.सात) या पदाचा प्रभार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्विकारला होता. मंगळवारी (ता.आठ) जी. श्रीकांत यांच्या नियुक्तीचे आदेश महाबीज मुख्यालयात धडकले असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभार स्विकारण्यास सांगण्यात आले आहे. जी. श्रीकांत हे अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होते. त्यांच्या काळात विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेचे नाव राज्यभर गाजले होते. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती वैशिष्टयपुर्ण आहे. --कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या-- सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महाबीजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सेवा निवृत्त कर्मचारीही आंदोलन करणार आहेत. आपल्या मागण्या नव्या संचालकांच्या माध्यमातून शासनाकडे मार्गी लागतील अशी अपेक्षा श्रीकांत यांच्या नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. (संपादन - विवेक मेतकर) |
|||