esakal | सर्वसाधारण सभा गुरूवारी; विषय पत्रिकेवर दोन डझनावर ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: General meeting of Zilla Parishad on Thursday; Resolution over two dozen

 जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १०) होणार आहे. सभेत तब्बल ३७ ठराव मांडण्यात येणार आहेत. ही सभा ऑनलाईन पद्धतीने हाेणार आहे. ऑनलाईन सभेचा पूर्वानुभव लक्षात घेता विना अडथळा सभा हाेण्यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे.

सर्वसाधारण सभा गुरूवारी; विषय पत्रिकेवर दोन डझनावर ठराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १०) होणार आहे. सभेत तब्बल ३७ ठराव मांडण्यात येणार आहेत. ही सभा ऑनलाईन पद्धतीने हाेणार आहे.

ऑनलाईन सभेचा पूर्वानुभव लक्षात घेता विना अडथळा सभा हाेण्यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे.


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्यावर मर्यादा होत्या. परंतु आता आचार संहिता संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल ३७ ठराव विषय सूचीवर नमूद करण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त ३८ वा विषय ‘अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारा आहे. त्यामुळे वेळेवरही विषय मांडण्याची तरतूद नेहमीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. या सभेत सत्ताधारी आणि विराेधक अशा दाेघांकडूनही ठराव मांडण्यात येणार आहेत.


या विषयांचा समावेश
सर्वसाधारण सभेत एकूण ३७ ठराव मांडण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने ६९ गावे पाणी पुरवठा याेजना, व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानचे नियामक मंडळाला मंजुरी देणे, कान्हेरी (सरप) ग्रा.पं. इमारत पाडणे, जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे, दुधाळ जनावरे वाटप, बियाणे वितरण, शिकस्त वर्ग खाेल्या पाडणे, हातपंप दुरुस्ती कंत्राट देणे, शिवणी येथील पाझर तलाव हस्तांतरण न करणे, बाेरगाव निंघाेट व राजंदा पाझर तलावाच्या कामाला सुधारित मंजुरी देणे, वसाली ते वाडी रस्ता आणि तुलंगा-सांगाेळा-चतारी रस्ता बांधकामाची निविदा स्वीकृती, भांबेरी पळ पाणी पुरवठा याेजनेबाबत नाहरकत प्रमाणपत्र देणे आदींचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image