घरकुल योजना आर्थिक संकटात !

मनोज भिवगडे
Thursday, 10 September 2020

पावसाळ्यातही अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम झाले नसल्याने त्यांचा संसार उघड्यावर सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. लाभार्थी निधीसाठी सर्व पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहे. कोरोना संकटातही त्यांच्यावर ही वेळ आली असताना पदरी मात्र निराषाच आली आहे.

अकोला :  प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी आवास योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवड झालेल्या लाभार्थींची घरकुले अद्यापही अपूर्ण आहेत. शासनाकडून निधी मिळत नसल्याने १५ हजारांवर घरकुलांचे बांधकाम थांबले आहे.

शासनाकडून घरकुलासाठी येणारा निधी रखडल्याने जिल्ह्यातील १५,४४८ घरकुलाच्या लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास, पारधी आवास योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना टप्या-टप्प्याने अनुदानाची राशी वितरित केली जाते. हा निधी रखडल्याणे जिल्ह्यातील घरकुल बांधकामाला ब्रेक लागला आहे.

ऐन पावसाळ्यातही अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम झाले नसल्याने त्यांचा संसार उघड्यावर सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. लाभार्थी निधीसाठी सर्व पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहे. कोरोना संकटातही त्यांच्यावर ही वेळ आली असताना पदरी मात्र निराषाच आली आहे.

आकडे बोलतात
४५७३६ ः घरकुलाचे लक्ष्यांक
३९६८९ ः मंजुरी मिळाले घरकुल
२४२४१ ः कामे पूर्ण झालेली घरकुलं
१५४४८ ः अपूर्ण घरकुलं

लाभार्थींकडून तक्रारी
अपूर्ण घरकुलांची आणि नव्या घरकुलांबाबत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांची घरकुले अपूर्ण आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी बुधवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यालयात जावून घरकुलांबाबत माहिती घेतली. शासनाकडून निधीच प्राप्त होत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

घरकुलांबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासनाने गरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
- पंजाबराव वडाळ,कृषी व पशुसंवर्धन सभापती, जि.प. अकोला

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Gharkul scheme in financial crisis